आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेद्वारे 365 रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभागात ओपीडी नोंदणीची सुविधा
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. नवी दिल्ली, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ऑक्टोबर 2022 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल अभियान या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत स्कॅन आणि शेअर सेवेद्वारे बाह्य रुग्ण विभागासाठी जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून 365 रुग्णालयांनी ती स्वीकारली आहे. क्यू आर कोडवर आधारित त्वरित नोंदणी सुविधेअंतर्गत या सुविधेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागात आतापर्यत 5 लाख रुग्णांना लांबलचक रांगांमधली त्रासदायक प्रतीक्षा टाळणे आणि वेळेची बचत करणे शक्य झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आयुषमान भारत डिजिटल मोहिमे अंतर्गत सुरु असलेल्या जलद आणि विना रांग ओपीडी नोंदणीचे कौतुक केले आहे.
याद्वारे सहभागी रुग्णालये (खाजगी किंवा सरकारी) रुग्ण नोंदणी विभागात विशिष्ट क्यू आर कोड दर्शवतात. रुग्णांना त्यांच्या मोबाईल फोनवरून (एबीएचए ॲप / आरोग्य सेतू ॲप / EkaCare, DRiefcase, बजाज हेल्थ, पे टी एम ॲप यांचा वापर करून) रुग्णालयाचा विशिष्ट क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो आणि त्यांची ABHA माहिती (नाव, वय, लिंग आणि ABHA क्रमांक इत्यादी तपशील) रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) सोबत सामायिक करावे लागतात. यामुळे कागद रहित नोंदणी शक्य होऊन रुग्णाला त्वरित टोकन नंबर मिळतो. रुग्णाच्या वेळेची बचत होते आणि आरोग्य सुविधा नोंदणी साठी आवश्यक संसाधनाच्या बाबतीत रुग्णालयाला देखील लाभ होतो. त्यामुळे रुग्णाची आरोग्यविषयक माहिती ABHA (आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी) जोडली जाते ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या फोनवरून कधीही कुठेही ही माहिती उपलब्ध होऊ शकते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या