Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड आगाराचा भोंगळा कारभार अन बस स्थानकावर प्रवाशांचे अतोनात हाल.

 

मनमाड आगाराचा भोंगळा कारभार अन बस स्थानकावर प्रवाशांचे अतोनात हाल.

बस स्थानकावर सुट्टीच्या काळात प्रवाशांची गर्दी होत असली तरी त्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अपयशी ठरले आहे.

जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.मनमाड बस स्थानका मध्ये जागोजागी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांना व वय वृद्धांना शाळेतील मुलांना या खड्ड्याचा सामना करावा लागत असतो कित्येक वेळी वृद्ध या खड्ड्यात चालता चालता पडलेले आहेत बस चालकांना पण या खड्ड्यांमुळे खूप कसरत करावी लागते 

जाहिरात फलकाखाली गर्दी केलेल प्रवासी... अस्वच्छता असल्यामुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी... पिण्याची पाण्याची सोय नाही... कचरा पेटवल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास... असे चित्र सध्या मनमाड बस स्थानकावर आहे. शहरातील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या या बस स्थानकावर सुट्टीच्या काळात प्रवाशांची गर्दी होत असली तरी त्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अपयशी ठरले आहे
.


उन्हाळ्याची सुट्टी व लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे शहरातील मनमाड  बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु,  बसस्थानकांवर प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. या बस स्थानकावर पिण्याची पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना  परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून विकत पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे , या मध्ये खाजगी दुकानदारांना आर्थिक लाभ पोहोचवण्या करिता एस टी महामंडळाने मोफत पाणीपोई बंद तर केली नाही ना असे नागरिकांमधून प्रश्न विचारण्यात येत होते?


तसेच, प्रवाशांना बस स्थानकामध्ये  अनेक प्रवाशांना गाडीची वाट पाहत तासन् तास उन्हामध्ये उभे राहवे लागते.  बसस्थानकावर ठिकठिकाणी कचरा पडला असल्यामुळे दुर्गंधीचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बहुतांश वेळा बस स्थाकावरील साफसफाई करणारे कर्मचारी कचरा गोळा करून स्थानकाच्या परिसरातच पेटवून देतात. त्यामुळे गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धुराचा त्रासदेखील होत आहे. मनमाड नगर परिषद ची कचरा व्यवस्थापन गाडी रोज सकाळी आपल्या भोंग्याद्वारे जनजागृती करत असते की कचरा जाळल्यास अथवा जळतांना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येऊ शकते असे असतांनाही देखील

मनमाड बस स्थानकावर सर्रास कचरा जाळल्या जातो यावर मुख्याधिकारी  साहेब मनमाड नगरपरिषद कचरा जाळणाऱ्यावर कारवाई करतील का असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे?
नागरिकांच्या मते निदान सुट्टीच्या व गर्दीच्या हंगामध्ये बसस्थानकावर महामंडळाने सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या