Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरातील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी करणारे आरोपीतांना अटक व दोन मोबाईल जप्त



 मनमाड शहरातील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी करणारे आरोपीतांना अटक व दोन मोबाईल जप्त.

जन आवाज न्युज.

मनमाड.याबाबत माहिती की, दिनांक २९-०१-२०२३ रोजी मनमाड शहरातील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारातुन आठवडे बाजारात बाजार खरेदी साठी आलेल्या दोन लोकांचे मोबाईल चोरीस गेले होते. त्याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरुन मनमाड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रल्हाद गिते यांनी लागलीच आठवडे बाजारात पेट्रोलिंग साठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या असता आठवडे बाजारात साई प्रसन्न लॉन्स समोर संशयास्पद हालचाल करतांना मिळुन आलेले ०१) सुनिल कोयल पवार वय २२ वर्ष ०२) लकी परबेसिंग सोलंकी वय २० वर्ष दोन्ही राहणार २८, मेनरोड, उनिदा भोपाल मध्यप्रदेश यांची चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात गुन्हयात चोरीस गेलेले दोन मोबाईल व एक मोटारसायकल मिळुन आली. आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण, मा.श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव, मा. श्री समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री प्रल्हाद गिते, पोना गणेश नरोटे, पोना मुदस्सर शेख पोशि गौरव गांगुर्डे, पोशि राजेन्द्र खैरनार, पोशि रणजित चव्हाण, पोशि संदिप झाल्टे, पोशि राहुल बस्ते, मपोशि सपना गवांदे यांनी केली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या