रिपाईच्या वतीने मनमाड रेल्वे स्टेशन येथे अन्नदान.
जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.
मनमाड.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६.डिसेंबर या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबई दादर येथे चैत्यभूमी वर अभिवादन करण्यासाठी रेल्वेने जात असतात.
मनमाड रेल्वे स्टेशन हे जंक्शन असल्याने येथून दादरला जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या थांबतात.
येणाऱ्या जाणाऱ्या भीम अनुयायांची जेवणासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मनमाड रेल्वे स्टेशन,येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अन्नदान करण्यात आले.
या वेळी रिपाईचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आहिरे,पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,नगरसेवक गंगा दादा त्रिभुवन,मयूर बोरसे,पद्माकर निळे,सुरेश शिंदे,प्रशांत दराडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या