लोकेशबालकाच्या खुनाच्या गुन्हेगारास फाशीची शिक्षा व्हावी. मनमाड रिपाई ची मागणी.
जन आवाज न्युज.
मनमाड. येथील नेहरू भवन शेजारील एकलव्य नगर येथील लोकेश सुनील सोनवणे (वय 9 वर्ष) हा इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बेपत्ता झाला याबाबत त्याच्या पालकांनी हरविल्याची फिर्याद देखील दाखल केली परंतु दुर्देवाने सदर विद्यार्थ्यांचा रेल्वे पुणे दौड लोहमार्गाजवळील जलशुध्दीकरण केंद्रा जवळील झाडाझुडपात त्याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला.
विद्यार्थ्यास अशा पध्दतीने मारणे ही दुर्दैवी घटना समस्त मानवतेला काळीमा फासणारी आहे. अशा अशा दुर्देवी घटनेचा रिपब्लिकनपार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तीव्र शब्दात निषेध करीत असून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. मनमाड सारख्या शांतताप्रीय शहरात कायद्याचा धाक राहिलेल्या नसलेल्या उन्मात मारेकल्याचा जळजळीत निषेध करीत असून मारेकल्यास मरेपर्यंत फाशी ची मिळावी, सदर खटला हा जलद न्यायालयात चालविण्यात येवून लोकेशला न्याय मिळावा अशी मागणी रिपब्लिकनपार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक. प्रल्हाद गीते यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.या वेळी रिपाई जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे, रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष गंगा दादा त्रिभुवन, पी आर निळे ,किशोर अहिरे, सुरेश शिंदे, प्रमोद अहिरे, सुरेश जगताप, दिनकर कांबळे, विलास अहिरे, बाबा शेख आदी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या