Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बुधलवाडी येथील होम मिनिस्टर व सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद.

 

बुधलवाडी येथील होम मिनिस्टर व सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद.

जन आवाज न्युज.

 मनमाड.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज दुसरा कार्यक्रम प्रभाग क्रमांक ५ व ६ अंतर्गत बुधलवाडी मराठी शाळा येथे आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. 
    या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी तुडूंब गर्दी केली होती, यात गृहिणी, बाल गोपाल तसेच वयोवृध्द मातांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. 


   या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी करंजवण पाणी योजना कशी असणार आहे ,पाणी कसे येणार आहे यावर सविस्तर माहिती असलेली चित्रफित उपस्थित महिलांना दाखवली. विशेष म्हणजे या योजनेचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या पुढे मनमाड कर माता भगिंनिंसाठी २ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्यात आपणास करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम कसे सुरू आहे हे थेट तिथे जाऊन दाखवले जाणार असून यात आपला चहा नाश्ता व प्रवासखर्च आण्णा स्वखर्चातून देणार आहेत अशी माहिती दिली.


     लवकरच प्रत्येकाच्या घरात नियमित पाणी येणार या आनंदाने अनेक महिलांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णा व ताई यांचे आभार ही मानले. 


    आज झालेल्या कार्यक्रमात १५ विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. विविध खेळातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी टिव्ही, डिनर सेट तसेच ट्रॉली बॅग देण्यात आली. सोबतच अनेक विजेत्यांना पैठण्या तर विविध बक्षिसे ही या वेळी महिलांनी प्राप्त केले. 


    आजचा कार्यम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना मनमाड शहर पदाधिकारी, शिवसैनिकांनी मेहनत घेतली.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या