आदिवासी बालक लोकेश सोनवणे च्या हत्येची सखोल चौकशी करावी व शहारात पोलीस संख्या त्वरित वाढवावी मनमाड शहर भाजपच्या वतीने मागणी.
जन आवाज न्युज.
मनमाड शहर भाजपा च्या वतीने आदिवासी बालक कुमार लोकेश सोनवणे च्या हत्येची सखोल चौकशी करावी शहारात पोलीस संख्या त्वरित वाढवावी म्हणून मागणी निवेदन गुरुवार दिनांक 01. डिसेंबर रोजी मनमाड शहरात माणुसकी ला काळिमा फसणारी घटना घडली मनमाड शहर नेहरू भवन एकलव्य नगर येथील आदिवासी बालक कुमार लोकेश सुनील सोनवणे वय (06/07) हा लहान बालक परवा दुपारी बेपत्ता झाला होता त्याची काल निर्घृण पणे हत्या करून रेल्वे रुळावर तुकडे करून फेकून देण्यात आल्याचे उघड झाले म्हणून या निरागस लहान बालकाची क्रूर निर्घृण हत्या करणाऱ्या खुनी नराधमास पोलीस नी अटक केली आहे पण या हत्ये मागील षडयंत्रा ची सखोल चौकशी करावी आणि पीडित बालकाच्या कुटूंबियाना न्याय मिळून द्यावा तसेच मनमाड शहरच्या लोकसंख्ये च्या तुलनेत मनमाड शहर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढवावी तसेच मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अपूर्ण बांधकाम अवस्थेत असलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केट हा अवैध कार्यवायाचा मोठा अड्डा झाला असून तेथे त्वरित कार्यवाही करावी अश्या विविध मागण्या चे सविस्तर निवेदन मनमाड सर्कल कार्यालयात तलाठी जोपूळे यांना देण्यात आले या गंभीर घटने ची भाजपा नेत्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आदरणीय डॉ भारती पवार यांनी त्वरित दखल घेतली असून पोलीस प्रशासना च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कठोर कार्यवाही च्या सूचना दिल्या आहेत या मागणी निवेदनवर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा नाशिक जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा आर्थिक सेल जिल्हा जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावत जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन,भाजपा भटके विमुक्त मोर्चा जिल्हा सरचिटणीस अकबर शाह, भाजपा शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव,दिपक गोयल भाजपा मनमाड शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ सोनीताई पवार, सौ जयश्री कुंभार भाजपा दिव्यांग आघाडी सरचिटणीस बुऱ्हाण शेख,भाजपा व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष अमित गोगड, भाजपा शहर उपाध्यक्ष अमित सोनवणे, बुधन बाबा शेख, मुतूझा रस्सीवाला भाजपा शिक्षक सेल शहर अध्यक्ष द्वारकानाथ झांबरे,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी चे शहर अध्यक्ष संजय चोपडा भाजपा ओबीसी आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद सानप भाजपा सहकार आघाडी चे शहर अध्यक्ष किरण उगलमूगले, भाजपा शहर सचिव मयूर माळी, सुमेर मिसर,राजेंद्र भाबड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद मूळे, अनंता भामरे,प्रमोद जाधव, आकाश बोरसे, संतोष पगारे, सुरेश बोरसे, लखन साळवे,रोशन पठाण, राजू हॅन्ड्री अंकल यांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी वरील भाजपा पदाधिकारी सह भाजपा कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते वरील निवेदन च्या प्रति माहिती साठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय सौ डॉ भारतीताई प्रवीण पवार यांना पाठविण्यात आल्या आहेत संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जलील अन्सारी यांनी केले या प्रसंगी लोकेश सोनवणे ला न्याय मिळावा म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच मृत लोकेश सोनवणेयास मनमाड शहर भाजपा तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या