प्रभाग क्र.७व९येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद.
जन आवाज न्युज.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज तिसरा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 7 व 9 अंतर्गत माऊली रोड विनोद भाऊ ललवाणी यांच्या निवासस्थाना जवळील चौकात संपन्न झाला आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी तुडूंब गर्दी केली होती, यात गृहिणी, बाल गोपाल तसेच वयोवृध्द मातांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी करंजवण पाणी योजना कशी असणार आहे ,पाणी कसे येणार आहे यावर सविस्तर माहिती असलेली चित्रफित उपस्थित महिलांना दाखवली. विशेष म्हणजे या योजनेचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या पुढे मनमाड कर माता भगिंनिंसाठी २ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्यात आपणास करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम कसे सुरू आहे हे थेट तिथे जाऊन दाखवले जाणार असून यात आपला चहा नाश्ता व प्रवासखर्च आण्णा स्वखर्चातून देणार आहेत अशी माहिती दिली.
लवकरच प्रत्येकाच्या घरात नियमित पाणी येणार या आनंदाने अनेक महिलांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णा व ताई यांचे आभार ही मानले. आज झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. विविध खेळातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी टिव्ही, डिनर सेट तसेच ट्रॉली बॅग देण्यात आली. सोबतच अनेक विजेत्यांना पैठण्या तर विविध बक्षिसे ही या वेळी महिलांनी प्राप्त केले.
विशेष महिला पुरस्कार सौ राणी भंडारी व्यवसाय क्षेत्र, सौ गोविंदा विनोद शर्मा व्यवसाय क्षेत्र, सहलीलाबाई पंडितराव सोनवणे भजनी मंडळ, श्रीमती प्रिया राजपूत शिक्षिका, सौ पुष्पा मनोज खडांगळे समाजसेवा, सौ सविता चंद्रकांत आव्हाड समाजसेविका, सौ सुवर्णा बोरसे समाजसेविका, डॉक्टर प्रियांका भंडारी आरोग्य, सौ सुशीला बारसे सामाजिक उपक्रम, सौ सुनीता नेरकर सामाजिक उपक्रम, संगीता पराशर नर्स गव्हर्मेंट हॉस्पिटल, सौ डॉक्टर नीलिमा गुजराती आरोग्य, श्रीमती जयश्री ताई बरडिया सामाजिक क्षेत्र, सौ राधा नंदकिशोर बागुल साडी डिझायनर, डॉक्टर प्रियंका छाजेड आरोग्य, सौ भागू गायकवाड समाजसेविका प्रथम पुरस्कार सौ दीपिका यश हिरण टीव्ही सेट द्वितीय पुरस्कार सौ संगीता राजेंद्र खरे डिनर सेट तृतीय पुरस्कार सौ श्वेता आशिष ललवाणी ट्रॉली बॅग लकी ड्रॉ पैठणी विजेते सौ कार्तिकी परदेशी, सायरा शेख, वंदना जगताप, संगीता खरे, रोहिणी पाटील, श्रद्धा सोपे, मालती गुजराथी, लीना वाघ आजचा कार्यम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना मनमाड शहर पदाधिकारी, शिवसैनिकांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या