मुख्यमंत्र्यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट.
जन आवाज न्युज.
मुंबई.शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सध्या उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा एकत्र येत युतीच्या रुपात सत्ताशकट हाकत आहेत. दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाशी आघाडी करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. याच कारणामुळे राज्यात आगामी काळात नवे सत्तासमीकर उदयास येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. आगामी काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट होणार आहे, असे म्हटले जात होते. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे आज (१६ नोव्हेंबर) प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच आगामी विधानसभा निवडणूक या विषयांवर चर्चा झाल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काळात घोषित महाालिका निवडणुका तसेच २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व मान्य असल्याचेही प्रकाश आंबेडकर यापूर्वी म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती. शिवशक्ती- भिमशक्ती एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बाब ठरेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी दिली होती. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अद्याप अधिकृतपणे भेट झालेली नाही. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकरांना भेटले असून आगामी काळात कोणते राजकीय समीकरण उदयास येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या