Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बालदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा.



 बालदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा.

जन आवाज न्युज.

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि बालहक्क संरक्षण संघ,महाराष्ट्र राज्य
यांच्या संयुक्त रित्या घेण्यात आलेल्या नशाबंदी विषयावरील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई पब्लिक स्कूल,सांताक्रूझ येथे संपन्न झाले.
उपरोक्त कार्यक्रमाला डॉ  संदीप नेमलेकर ( दिप अर्चन चॅरिटेबल ट्रस्ट - विश्वस्थ ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि मुलाना व्यसनावर काव्यातून प्रभोधन केले. मान्यवरांचे स्वागत तुलसीरोप देऊन 'झाडे लावा झाडे जगवा' हा संदेश देत करण्यात आले. मुंबई पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका कल्पना बांबले आणि वैभवी ठाकूर मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.दोन शाळांच्या एकूण 90 मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले आणि इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

बालहक्क संरक्षण संघाचे मुंबई उपनगरचे अध्यक्ष,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र राज्य, विवेक साळवी यांनी संघाच्या वतीने मुलांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप केले. नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्य च्या मुंबई उपनगर च्या संघटिका दिशा कळंबे यांनी मुख्याध्यापिकांना संविधान कलम 47 चे वाटप केले. नशाबंदी चे प्रतिनिधी शशिकला नायर,लहु भातडे,चेतना,रजनी यांनी कार्यक्रमाचे नियोजन सांभाळले. नशाबंदीवर शपथ घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या