Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जमियत उलमा नाशिक तर्फे सर्वधर्म सदभावना सम्मेलन उत्साहात साजरा.

 

जमियत उलमा नाशिक तर्फे सर्वधर्म सदभावना सम्मेलन उत्साहात साजरा.

जन आवाज न्युज.

नाशिक. भोले मंगल कार्यालय, उत्तम नगर, सिडको, नाशिक इथे जमियत उलमा नाशिक र्तफे सर्वधर्म सदभावना सम्मेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे  सुत्र संचालन मौलाना सलीम चिश्ती यानी केली, सम्मेलनाचे उद्देश्य आणि हेतु बदल माहिती देता ना सांगितले की "आपल्या प्रिय भारतात एक मेकांनबद्दल प्रेम व बंधुभाव याची कमतरता आहे, देशातील प्रेम, बंधुभाव व एकता यांच्या वाढीसाठ हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे।"

शिख समाजाचे प्रमुख श्री ज्ञानी जसविंदर सिंह जी (पंचवटी) यानी कार्यक्रमाची स्मृती करतांना म्हटले की "सर्व धर्मात प्रेम आणि एकतेचा संदेश आहे आणि भेदभावाला जागा नाही" 
मान्य श्री कुलविंदर सिंह यांच्या म्हणण्यानुसार "सदभावना ही वास्तवात उतरणे गरजेचे असुन नाटक होता कामा नये "

 मोटिवेशनल ट्रेनर किरण मोहिते सरांनी असे मंडले कि "सदभावना ही फक्त शब्दांनी ना होता प्रत्यक्षात कृत्य यायला पाहिजे

 जमियत उलमा, नाशिक चे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल्लाह साहेब यांच्या म्हणण्यानुसार "प्रत्येक व्यक्तींचे दोन घरे आहेत, पहिला घर जिथे तो राहतो आणि दुसरा घर म्हणजे संपूर्ण भारत देश, ज्या प्रकारे घरातील प्रत्येक सदस्याचे एकमेकांवरील प्रेम आहे त्याच पद्धतीने देशातील प्रत्येक व्यक्तीला एकमेकांशी प्रेम असायला हवेत,"
 प्रोफेसर वाजिद अली सरांनी सदभावनेचे वास्तव खुप चांगल्या प्रकारे कथन केले आणि सदभावना कशाप्रकारे निर्माण होईल हे सांगितले, 

श्री डॉ रमणगिरी महाराज (त्र्यंबकेश्वर) यांनी बंधुभाव एकता यांवर चांगले प्रकाश टाकले, कार्यक्रमाचे शेवटी सर्व पाहूण्यंचे  गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजक व जमियत उलमा नाशिक चे सचिव मौलाना सलीम चिश्ती यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले आणि सदभावना सम्मेलनाची गरज भासल्यास दर दोन महिन्यांनी अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात निश्चित केले, या कार्यक्रमासाठी मंच चे कार्यकर्ते व सदस्य अब्दुल्लाह सर (रिलेकसो), कृष्णा शिंदे सर, सरफराज भाई, आरिफ शेख (अमन), अमिन सर (मिलन), संतोष पाटील सर, अँड ऐकाज मेमन, अँड असिम शेख,जावेद सैय्यद,वसीम कुरैशी,अकील सैय्यद,हेमंत गायकवाड,शादाब खान,समीर मणियार,इत्यादी सदस्यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या