Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

येवला बस स्थानक फेरीवाल्यांनी दिले एका निराधार व्यक्तीला जीवदान देण्याचे आधार.

सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, आकील पठाण,अकबर पठाण,अनवर भाई,राहुल मोरे, भीमा केदारे,हर्षदभाई, फैसल भाई,विशाल खैरनार आदी


 येवला बस स्थानक फेरीवाल्यांनी दिले एका निराधार व्यक्तीला जीवदान देण्याचे आधार.

जन आवाज न्युज.

   येवला बस स्थानक येथे गेल्या काही दिवसापासून सलीम खान नामक वयोवृद्ध आजारी अवस्थेत दिसून येत होता परंतु सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी
त्यांची चौकशी केली असता त्यांनी कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे सांगितले इकडे कोणीच नातेवाईक  नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्यासह बस स्थानक फेरीवाले यांनी सलीम खान या  व्यक्तीच्या पायाला गंभीर जखम व पाय सडण्याच्या अवस्थेत दिसून आल्याने तात्काळ आरोग्य विभागाच्या टोल फ्री नंबर 108  या क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून सलीम खान यांच्या पायावर शस्त्रक्रिया करत वेळोवेळी संतोष गायकवाड व त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेत तीन महिने पूर्णपणे उपचार घेत बरे करून गायकवाड यांनी सामुदायिक खर्च करत सलीम बाबांना नवीन ड्रेस व खाण्याच्या वस्तू घेऊन रेल्वेचे तिकीट बुकिंग करून मनमाड स्थानकातून कर्नाटक एक्सप्रेस गाडीने रवाना करून देण्यात आले यावेळी सलीम बाबा आपल्या परिवाराला भेटणार व तीन महिन्याच्या  सहवासात दुरावा झाल्याने बस स्थानक फेरीवाल्यांच्या डोळ्यात अश्रू येताना दिसून आले या कामगिरीबद्दल सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्यासह सहकाऱ्यांचे परिसरातील लोकांनी व बस स्थानक चालक वाहक यांनी कौतुक केले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, आकील पठाण,अकबर पठाण,अनवर भाई,राहुल मोरे, भीमा केदारे,हर्षदभाई, फैसल भाई,विशाल खैरनार आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या