शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज, उघडपणे व्यक्त केली खदखद....
जन आवाज न्युज.
नाशिक.राज्यातील सत्तांतरानंतर अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता यातच शिंदे गटातील एक आमदार आपल्याच पक्षातील आमदारावर नाराज असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या आहे. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हे आहे. त्यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू काही दिवसांपासून सुरू आहेत. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत आमदार सुहास कांदे नव्हते. आता आमदार कांदे यांनी आपली नाराजी उघडपणे मांडली आहे. पालकमंत्री दादा भुसे आपल्याला डावलत आहेत, असा आरोप आमदार कांदे यांनी केला आहे. कांदे म्हणाले, मी शिंदे गटाचा आमदार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीही शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. मात्र, असे असूनही मला जिल्ह्यातील कोणत्याच बैठकीला आमंत्रण दिले जात नाही. मला जिल्ह्यातील विकासकामांबाबतच्या सर्वच बैठकांपासून वेगळे का ठेवले जात आहेत?, मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच गिरीश महाजन होते, तेव्हा ते आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीला बोलवायचे. असे कांदे म्हणाले. जिल्ह्यातील पक्षाच्या निवडी चुकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे पक्ष खुंटला आहे. पदाधिकारी निवडताना दादा भुसे यांनी आपल्याला डावललं. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच संघटनेकडे दिवसातून किमान एक तास तरी लक्ष द्यावे, असे आवाहनही आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या