कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित भाऊबीज रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लासलगाव येथे संपन्न.
जन आवाज न्युज.
लासलगाव. कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित भाऊबीज रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लासलगाव येथे संपन्न झाला. या वेळी कुणाल दराडे.मनीषाताई होळकर संचालिका संस्कार इंग्लिश मेडियम,स्वातीताई बुब,डॉ संगीताताई सुरसे, ज्योतीताई सुरासे प्रमुख उपस्थित होत्या. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय सुंदर रांगोळ्या भाऊबीजच्या दिवशी लासलगाव येथे साकारण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी परीक्षक असलेल्या आशा झाल्टे,डॉ.संगीता सुरसे,भारती ब्रह्मेचा,आशा पायमोडे यांच्या परीक्षणानुसार प्रथम क्रमांकाचे बक्षीस दीक्षा सुनील राऊत,द्वितीय,मधुरा गणेश निकम,तृतीय ऋतुजा दरेकर,चतुर्थ गार्गी किरण निकम व श्रावणी निलेश देसाई यांना गौरवण्यात आले.उत्तेजनार्थ बक्षीसामध्ये प्रियंका पलोड श्रद्धा डोंगरे,माधवी वर्मा,दिपाली गायकवाड,साक्षी बांगर,आदिती पवार,साक्षी सोनवणे सह सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या रांगोळी स्पर्धेसाठी लासलगाव शहरातील महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कुणाल दराडे यांनी समाधान व्यक्त केले व अशी स्पर्धा लासलगाव शहरात प्रथमच सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला व पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात या स्पर्धा आयोजित करण्यात येतील असे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विलास कांगणे यांनी तर आभार अर्चना डुंबरे यांनी मानले.परीक्षक आशा झाल्टे यांनी सर्व रांगोळ्यांचे विस्तृत विवेचन केले.या कार्यक्रमासाठी अनिता चव्हाण,आशा पवार,शरयू निकम,ज्योती कांगणे,पल्लवी कांगणे,सुजाता वाकचौरे, कविता चव्हाण,वृषाली पवार,अनिता देसाई,संगिता आव्हाड,अर्चना कुलकर्णी,आहेर काकी,सलोनी बोथरा, पूनम झांबरे,शिल्पा मुंदडा,साक्षी गोमासे,कावेरी पालवे कल्पना माने,सुनिता बोडके,सौ जावरे,सौ पलोड,प्रा आशा पवार व कुणाल दराडे फाउंडेशनच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या