मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी भेट देत गुरुद्वारामध्ये माथा टेकला.
मनमाड : संत गुरुनानक यांची उद्या ५५३ वी जयंती असल्याने मनमाड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी भेट देत गुरुद्वारामध्ये माथा टेकला. गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर राज्यभरातून नागरिक दर्शनासाठी दाखल झाले आहे.
नांदेड नंतर महत्वपूर्ण आणि मानाचा मानल्या गेलेल्या येथील प्रसिद्ध 'गुप्तसर साहिब' गुरुद्वारामध्ये उद्या ता ७ रोजी संत गुरुनानक यांच्या ५५३ व्या जन्मसोहळ्यानिमित्त दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमांसह अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गुरुनानक यांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील गुरुद्वाराचे महत्व पाहता राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी भेट दिली. यावेळी गुरुद्वारामध्ये असलेल्या लंगरमध्ये जात मंत्री भुसे आमदार कांदे यांनी पाहणी केली. यावेळी गुरुद्वारामध्ये जात त्यांनी दर्शन घेतले यावेळी गुरुद्वारातर्फे मंत्री भुसे आणि आमदार कांदे यांचा गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना मंत्री भुसे, आमदार कांदे यांनी संबोधित केले. गुरुद्वारास काही मदत लागल्यास मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहरप्रमुख मयुर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील हँडगे, अमीन पटेल आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या