डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना गुरुकुमार निकाळे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना गुरुकुमार निकाळे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
जन आवाज प्रतिनिधी.
मनमाड शहरातील 90 ते 100 वर्ष जुने अधिकृत झोपडपट्टी वसाहत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 विभागाची नगरपालिकेत नोंद आहे. प्रभाग क्र.4 डॉ. आंबेडकर चौक संपूर्ण परिसर हा दलित वस्तीचा आहे. याठिकाणी निवासी अतिक्रमणे आहे. दलित प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात त्यायोजनेव्दारे दलित प्रवर्गातील जीवनमान उंचवावे हा प्रमुख उद्देश असतो. या भागातील मागासवर्गिय समाजाची बऱ्याच कुटुंबाची कच्ची घरे अस्तित्वात असल्याने त्यांना पक्की घरे मिळावी म्हणून पंतप्रधान आवास योजनेव्दारे गरीबांना स्वतःच्या हक्काचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ही योजना आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेचा 7/12 उतारा असणे अनिवार्य असून त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे असल्यामुळे शासनाच्या पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. मागासवर्गीय कुटुंबाना स्वतःचे पक्के घर मिळावे याकरीता शासन अध्यादेश दि. 27 नोव्हेंबर 2018 क्रमांक एमयुएन- 2018 / प्र.क्र. 197/नवि-18 या नुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे कायम करुन भोगवटादार वर्ग 2 नुसार उतारा पट्टी लागू करण्यात यावी. या संदर्भात मी वेळोवेळी मनमाड नगरपालिका व भुमिअभिलेख कार्यालय नांदगाव यांना पत्रव्यहार करुन व अमरण उपोषण व आंदोलन करुन सदर प्रभागातील जागेची मोजणी करण्याकामी चलन भरण्यास भाग पाडले. मात्र भुमिअभिलेख कार्यालय नांदगाव यांच याकामात सातत्याने दिरंगाई होत असून शासकीय काम अत्यंत संथ गतीने सुरु असून येथील रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण होणेकामी आपल्यास्तरावरुन संबंधीतांना आदेशित करुन कामास गती द्यावी असे निवेदन गुरु कुमार निकाळे यांच्यातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या