Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महालक्ष्मीचौक ते पाकिजा कॉर्नर रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावा तसेच पाकिजा कॉर्नर येथील शौचालयाजवळ साफसफाई करण्यात यावी अन्यथा रिपाई तर्फे आंदोलन करण्यात येईल.

 

महालक्ष्मीचौक ते पाकिजा कॉर्नर रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावा तसेच पाकिजा कॉर्नर येथील शौचालयाजवळ साफसफाई करण्यात यावी अन्यथा रिपाई तर्फे आंदोलन करण्यात येईल.

जन आवाज न्युज

मनमाड.येथिल गुरुव्दारा ते पाकिजा कॉर्नर पर्यंत या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम असतांना त्याचे काँक्रीटीकरण महालक्ष्मीचौकापर्यंत आलेले आहे. मात्र त्यापुढील पाकिजा कॉर्नर पर्यंतचे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण अपूर्ण राहिल्याने पुढील रस्ता हा कच्चा आहे परिणामी वाहनधारकांना येता-जातांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. सदर रस्ता हा शहरातील मध्यवर्तीठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सध्या रस्ता माती, धुळ यांचे साम्राज्य रस्त्यावर निर्माण झालेले आहे वाहने येतांना जातांना सदर धुळ व माती उडून आजुबाजूच्या दुकांनामध्ये जाते तसेच नागरीकांच्या या धुळ व मातीचा संपर्क मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सदर रस्ता हा पार्किजा कॉर्नर पर्यंत नेण्याचे इस्टीमेंट असतांना तो अपूर्ण आहे त्यामुळे वरील समस्यांना नागरीकांना व वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.


तसेच पाकिजा कॉर्नर येथील शौचालयाजवळ कचराकुंडी असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजुचे केरकचरा ओला व सुका एकत्रीत आणून टाकतात त्यामुळे परिसरात मोठ्या दुर्गंधी निर्माण होते यामुळे आजुबाजुच्या दुकान व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. तरी सदर बाबत तातडीने दखल घेऊन सदर प्रश्न मार्गी लावावा तसेच महालक्ष्मी चौक ते पाकिजा कॉर्नर पर्यंतचा अपूर्ण राहिलेला सिमेंट कॉक्रीटरस्ता त्वरीत पुर्ण होणेकामी कार्यवाही व्हावी अन्यथा रिपाई कुठलीही पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी आंदोलन हाती घेईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी न.पा. प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पाटेल यांना देण्यात आले या वेळी रिपाई जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष गंगा दादा त्रिभुवन पीआर निळे रुपेश अहिरे किशोर अहिरे सुरेश शिंदे गुरु कुमार निकाळे प्रमोद अहिरे सुरेश जगताप दिनकर कांबळे पापा शहा राजेंद्र अहिरे शेखर अहिरे व पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या