वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम साजरी करणारी ब्लूबेल शाळेने बाल दिवस देखील केला अनोख्या पद्धतीने साजरा...
जन आवाज न्युज.
बालदिवस म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना चा खास दिवस... नाशिक रोड येथील द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या ब्लूबेल शाळेत नेहमीप्रमाणे अनोखा बालदिन साजरा करण्यात आला. बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जम्पिंग बम्पिंग चा अतिशय मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांना आवडणारे कार्टून शाळेत विद्यार्थ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुंदर बाल नृत्य केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाल नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बाल दिना विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे शाळेमध्ये विशेष सत्कार करण्यात आला तो म्हणजे वेदिका चा जी मुलगी डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे त्या विद्यार्थिनीने आपण काय गमावलेला आहे हे न बघता आपल्याकडे काय आहे या गोष्टीवर तिने विजय मिळवलेला आहे. ती गणित व नृत्य या कला तिला जणू देवा कडूनच प्राप्त झालेले आहे. वेदिकाला अनेक सेलिब्रिटींना देखील तिला भेटण्याचा योग आलेला आहे.डीआयडी मधील धर्मेश सर,मुदस्सर खान साहेब, गणेश आचार्य, राघव जुयाल सर अक्षय पाल सर. अशा अनेक विविध दिग्गजांना वेदिका भेटलेली आहे व नाशिकमध्ये अनेक उपक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तिने हजेरी लावली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षकांनी मेहनत घेतली, सूत्रसंचालन प्रज्ञा सदावर्ते यांनी केले, परिपाठाच्या प्रमुख सुरेखा शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले व सर्वांची सांगड ज्योती अहिरे या शिक्षकांनी केली. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे सदस्य सर्वांनीच परिश्रम घेतले व सर्वांना मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल कदम यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या