Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

निवडणूक आयोगातर्फे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष्याला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव तर निवडणूक चिन्ह हे मशाल देण्यात आले,नांदगाव तालुका शिवसैनीक तर्फे चिन्हाचे जल्लोष साजरे करण्यात आले,

 

निवडणूक आयोगातर्फे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष्याला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव तर निवडणूक चिन्ह हे मशाल देण्यात आले,नांदगाव तालुका शिवसैनीक तर्फे चिन्हाचे जल्लोष साजरे करण्यात आले,

जन आवाज प्रतिनिधी.

केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे नाव  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व चिन्ह मशाल हे मान्यता प्राप्त झाल्याने मनमाड व नांदगाव विधान सभा शिवसेना मार्फत एकच भव्य जल्लोष कार्यक्रम पार पाडला गेला
शिवसेना *जिल्हा प्रमुख* गणेश  धात्रक,यांच्या मार्गदर्शनखाली *उप जिल्हा प्रमुख* संतोष बळीद, *सह संपर्क प्रमुख* प्रवीण  नाईक  *जिल्हा संघटक* संजय कटारिया यांनी आयोजित *शहर प्रमुख* माधव शेलार यांच्या नेतृत्वात आज दि. 11/10/2022 मंगळवार रोजी 12:00 वाजता एकात्मता चौक, मनमाड येथे आपल्याला मिळालेल्या नवीन चिन्ह *मशाल* याबाबत फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य जल्लोष कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना,अंगीकृत संघटना  शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व एक नवचैतन्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते, जणू नवक्रांतीची मशाल प्रत्येकाच्या मनामनात उजळू लागली आहे असे दिसत होते, *"एकच विचार एकच पक्ष आणि एकच लक्ष्य"* असे ब्रीदवाक्य प्रत्येकाच्या तोंडी होते यावेळी ज्येष्ठ नेते मा. आमदार राजेंद्र देशमुख,दिलीप सोळसे,मायकल फर्नांडिस,नगरसेवक कैलास गवळी, लियाकत शेख,प्रमोद पाचोरकर, अनिल दराडे,इरफान शेख,अंकुश गवळी, कयाम सैय्यद,शैलेश सोनवणे,खालिद शेख, गोटू केकान, प्रविण धाकराव,रियाज शेख,सनी करकाळे, हर्षल भाबड,रवी इप्पर, स्वराज देशमुख,संतोष साळुंके, हरिष आसर, राजु कासर,संतोष वाघ, वाल्मीक धात्रक,बाळु सुपेकर, सन्नी फसाटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व नांदगाव विधान सभा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या