उद्धव ठाकरेंचा 31 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर शिवसेना पुनर्बांधणी दौरा.
मुंबई जन आवाज प्रतिनिधी.एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव करून नंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्यानंतर उर्वरित शिवसेनेच्या पुनर्बांधणीचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आहे.त्यामुळे आमागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचे नियोजन केले असून, ३१ ऑक्टोबरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार, आमदार, जिल्हासंघटक, जिल्हाप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, युवासेनाप्रमुख तसेच त्या - त्या मतदारसंघातल्या विजयी आणि पराभूत उमेदवारांना हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
३१ ऑक्टोबरला परभणी, जालना, बुलढाणा आणि अकोल्यातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. १ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड या जिल्ह्यांची बैठक होईल. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव, यवतमाळ, लातूर, अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. नाशिक दिंडोरी धुळे नंदूरबार या जिल्ह्यांबाबत ३ तारखेला चर्चा होईल. या बैठकीनंतर ४ ते एकादशी तुळशी विवाहानिमित्त चार दिवस चर्चा बैठका होणार नाहीत. ७ नोव्हेंबर रोजी जळगाव, रावेर, पुणे बारामती, तर ८ नोव्हेंबरला शिरुर, मावळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ९ नोव्हेंबर रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्याचा दौरा करतील.
१० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर, शिर्डी, ११ नोव्हेंबरला सांगली, माढा, सोलापूर, साताऱ्यात, १२ नोव्हेंबरला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूरवरमध्ये पक्ष बांधणी मोहीम हाती घेतली जाणार आहे.
मुंबईत १३ आणि १४ नोव्हेंबरला बैठका.
भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्याने उद्धव ठाकरेंना यावेळी जोर लावावा लागणार आहे. त्यामुळे १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ते मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतील. या बैठका मुंबईत मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला आपापल्या विभागाचा अभ्यास करून हजर रहावे, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या