Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्ष नेता,मा, अंबादास दानवे साहेबांच्या हस्ते, सदाम अत्तार यांना मातोश्री रमाई सम्मान चिन्ह देऊन,उत्कृष्ठ रुग्णसेवा पुरस्कार देण्यात आले.

 

महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्ष नेता,मा, अंबादास दानवे साहेबांच्या हस्ते, सदाम अत्तार यांना मातोश्री रमाई सम्मान चिन्ह देऊन,उत्कृष्ठ रुग्णसेवा पुरस्कार देण्यात आले.


जन आवाज न्यूज, मनमाड, प्रतिनिधी.

कोरोना काळच्या भीषण महामारीत जर एखाद्या परिवाराचा सदस्य पॉझिटिव्ह आला रे आला, की त्या परिवारांने त्या रुग्णाला आपल्या घरातून /आपल्या पासून वेगळे केले, नातेवाईकांनी रुग्णांना मदत करण्यास देखील नकार दिले होते,त्या काळात दुर्दैवी परस्थिती अशी होती की, बापाची मयत उचलायला मुलांनी नकार दिले या नकाराची ध्वनी पितृसत्ता मानणाऱ्या या जगानी देखील ऐकली आहे, 
आपले मनोगत व्यक्त करतांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. ना. अंबादासजी दानवे साहेब यांनी सांगितले की Covid काळात धार्मिक स्थळे बंद होती,परंतु देव स्वतः वैद्यकीय सेवकांच्या रुपात रग्णांची सेवा करीत होते.
या भयावह परस्थितीत अनेकांनी माणूसकी धर्म देखील निभावले आहे, त्यातील मनमाड शहरातील एक सर्वधर्म समभाव मानणारा रुग्णसेवक सद्दाम भाई अत्तार आहे,
अत्तार संघटनेचे मनमाड शहराध्यक्ष सद्दाम भाई अत्तार हे Covid काळात  रुग्णवाहीका स्वतःच चालवत रुग्णांना मनमाड-ते-मालेगाव-मनमाड ते नाशिक संपूर्ण जिल्हाभर रात्र दिवस आपल्या जीवाची परवा न करता रुग्ण सेवा करत रुग्णांचे जीव वाचवण्याचे कार्य करत होते, सद्दाम अत्तार यांच्या या रुग्ण सेवेमुळे त्यांना कित्येक महिने आपल्या लहान चिमुकले मुले व आपल्या परिवारा पासून वेगळे रहावे लागले आहे

,

 त्यांच्या वडिलांनी देखील Covid काळात सद्दाम अत्तार यांच्या रुग्ण वाहीका चालवण्याच्या कार्याबद्दल नाराजगी व्यक्त केली होती,
परंतु सद्दाम अत्तार यांनी,  जरी परिवारांची भेट होत नसेल तर काय झाले, माझ्या या प्रयत्नांमुळे अनेकांना आपल्या आई वडिलांशी व मुलांशी सुखरूप भेट होत असेल,  त्यातच मी समाधानी झालो,
मी जरी घरी येत नसलो तर काय झाले, जीवन आणि मरण हे अल्लाह ताआला तर्फे आहे, असे सांगत सद्दाम अत्तार यांनी आपल्या वडिल व परिवाराची समजूत काढली, व  संपूर्ण जिल्हा भर आपली रुग्णसेवा पुरवली आहे, परिणामी सदाम अत्तार यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे  जिल्हातील व शहरातील अनेकांचे प्राण वाचले आहे,
ना धर्म ना जात सर्वधर्म समभाव उद्देशाने सद्दाम अत्तार यांनी जी रुग्ण सेवा दिली त्या रुग्णसेवेला यश प्राप्त झाले आहे, अनेकांचे प्राण या रुग्ण सेवेतून वाचले आहे ते कोरोना आजारातील रुग्ण आज सुखरूप आपल्या घरी आपले जीवन जगत आहे,
त्यांच्या या रुग्ण सेवा सामाजिक कार्याची पावतीच आहे की त्यांच्या या रुग्णसेवा ची दखल घेत मनमाड शहरातील मिलिंद सामाजिक संस्था यांनी महाराष्ट्र राज्यचे विरोधी पक्ष नेता,मा,अंबादास दानवे साहेबांच्या हस्ते,सदाम अत्तार यांना मातोश्री रमाई रुग्ण सेवा सम्मान चिन्ह देऊन,उत्कृष्ठ रुग्णसेवा पुरस्कार दिले आहे,
या पुरस्कार  प्राप्ती नंतर सद्दाम अत्तार यांच्यावर जणु अभिनंदन व शुभेच्छाचा पाऊसच पडला आहे,
तरी जन आवाज न्यूज तर्फे ग्रेट रुग्ण सेवक सदाम अत्तार यांना मातोश्री रमाई सम्मान चिन्ह मिळाल्या बद्दल *हार्दिक शुभेच्छा*,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या