Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कॅन्सर जनजागृती तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार 8888509003.


 कॅन्सर जनजागृती तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

मनमाड.येथील ईदगाह आयु.डी.पी. विभागातील डॉ. राठी हॉस्पिटल येथे लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व लायन्स क्लब मनमाड प्राईड तसेच मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत असे महिलांसाठी कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. यात जवळपास 100 च्या वर स्त्रियांची तपासणी रक्त तपासणी पँप स्नियर टेस्ट इत्यादी तपासण्या मोफत करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला

उद्घाटन लायन्सचे प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश जी कोठावदे होते याप्रसंगी लायन्स क्लब मनमाड सिटीच्या अध्यक्ष लायन वैशाली वाणी सेक्रेटरी रेखाताई येणारे खजिनदार सुचिता खताळ प्रोजेक्ट चेअर पर्सन डॉक्टर प्रताप गुजराती डॉक्टर निलेश राठी डॉक्टर अर्चना राठी ॲड.शशिकांत व्यवहारे डॉक्टर जालिंदर इंगळे सर भारत जगताप राजेंद्र माळी हर्षद गद्रे सर गणेश हडपे, सुशील संकलेच्या नितीन पवार वैभव काकडे पुष्पाताई मतकर स्नेहल भागवत संगीता कदम मनीषा अग्रवाल सौ डगळे लायन अरुण दराडे सौ विजया गुजराती सीमा कुलकर्णी इत्यादी सदस्य उपस्थित होते प्रतिष्ठित डॉक्टर सुनील बागरेचा डॉक्टर दिलीप मुथा नगरसेवक दिलीप तेजवानी हजर होते व्यासपीठावर लायन्स क्लब मनमाड प्राईडचे अध्यक्ष दिनेश मुनोत सेक्रेटरी सीए श्रेणिक.बरडिया खजिनदार डॉक्टर आकाश जैन व मानवता हॉस्पिटलच्या मंजुषा मॅडम व डॉक्टर रिजवाना मॅडम उपस्थित होते.

सूत्रसंचालन लायन विवेक बर्डिया यांनी केले प्राईडचे डॉक्टर मोहित लोढा डॉक्टर ऋता लोढा डॉक्टर सोनल भंडारी मंगलेश बकरीवाल डॉक्टर रूपाली जैन सौ मुनोत व सर्व लायन्स सभासद हजर होते प्रमुख पाहुण्यांनी दोन्ही क्लबच्या सेवा कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले याप्रसंगी डॉक्टर गुजराती लिखित कॅन्सर जनजागृती पर लेखमालेचे अनावरण करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या