Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहराला कायमस्वरूपी, कार्यकारी दांडाधिकारी, मंडळ अधिकारी नियुक्त करावे, भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना मांगणी,

 

मनमाड शहराला कायमस्वरूपी, कार्यकारी दांडाधिकारी, मंडळ अधिकारी नियुक्त करावे, भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना मांगणी.

मनमाड :- मनमाड शहर  हा जिल्ह्यातला तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मोठा शहर आहे, परंतु जिल्हाधिकारी तर्फे मनमाड शहरात वारंवार मंडळ अधीकारी बदलण्यात येत आहे परिणामी मनमाड शहराच्या नागरिकांना त्रास सहन करावं लागत आहे,
मंडळ अधीकारी बदली नंतर नवीन नियुक्त अधिकारी हे वेळेवर पदभार स्वीकारत नाही,त्या मुळे,शहरातील नागरिकांना प्रतिज्ञापत्र व इतर शासकीय कामासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागतो, मनमाडकरांना प्रतिज्ञापत्र वर सही साठी व इतर शासकीय कामा साठी नाईलाजाने नांदगाव तहसील येथे नेहमी जावं लागत आहे,
आज दी 15/09/2022  रोजी देखील मनमाड शहरात कार्यकारी दांडाधिकारी, मंडळ अधिकारी यांची अचानक बदली करण्यात आली, शहरातील नागरिकांन तर्फे बदली झालेले साहेबांना भ्रमनध्वनी, मोबाईल द्वारे संपर्क केले, परंतु त्यांची बदली झाली असे समजले,
तहसील कार्यालय नांदगाव येथे संपर्क साधले असता तेथे देखील कर्मचारी /अधिकारी यांची खूप कमतरता आहे,
असे वरिष्ठ अधिकारी तर्फे सांगण्यात आले,
या सर्व घटने नंतर भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तर्फे थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून,मनमाड शहरासाठी  कायमस्वरूपी कार्यकारी दांडाधिकारी, मंडळ अधिकारी देण्यात यावे, तसेच अचानक अधिकारी बदलीची गरज असल्यास त्या कार्यालयात कोणते काम (कार्य) किती दिवस बंद राहतील या संदर्भात तात्पुरता प्रभारी अधिकारी कोण आहे या संदर्भात नागरिकांना पूर्व सूचना देण्यात यावी,
अन्यथा भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलनात तर्फे कोणत्याही क्षणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल ,असे मांगणीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले,या वेळी नांदगाव तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, कादिर शेख, विष्णू चव्हाण, दानिश शेख,शकील शेख,भास्कर भाऊ, व नाशिक शहरातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या