भारतीय डाकतर्फे देण्यात येणारी अपघात विमा योजना मनमाडमध्ये सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनमाड डाक कार्यालयास देण्यात आले. सदर योजने अंतर्गत विमा धारकाला ३९९ रुपयांत १० लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण मिळते. सदर योजना हि जनसामान्यांसाठी अतिशय फायद्याची असल्याने व परीसारतील इतर तालुक्यात सदर योजनेस भरघोस प्रतिसाद मिळत असून सदर योजना मनमाड शहरातील नागरिकांना देखील उपलब्ध करण्यात यावी, असाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. सदर योजना हि भारतीय डाक विभागाने सुरु केली असून मनमाड कार्यालयात त्याचे माहिती पत्रक उपलब्ध होताच सदर योजना मनमाडच्या नागरिकांसाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मनमाड डाक कार्यालयातर्फे सिद्धार्थ गायकवाड यांनी दिली आहे. सदर निवेदनावर शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, प्रकाश बोधक, हबीब शेख, अक्षय देशमुख, आनंद बोथरा यांच्या सह्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या