Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनमाड शिवसैनिकांतर्फे आंदोलन करण्यात आले.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनमाड शिवसैनिकांतर्फे आंदोलन करण्यात आले.

मनमाड (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है ! शिवसेना जिंदाबाद ! जिंदाबाद ! शिवसेनेचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता

 
 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात मनमाड शहरातील शिवसैनिकांनी आंदोलन केले पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करावे लागले


शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाड शहरातील शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आंदोलन केले. शिंदे यांच्या या बंडात नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील सहभागी आहे आमदारांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे 
शिवसेना नेते गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माजी आमदार राजेंद्र देशमुख, शिवसेना नेते अल्ताफ खान, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, प्रवीण नाईक, तालुका संघटक संजय कटारिया आदींच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली दरम्यान काल अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा केली मात्र वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे स्थानिक पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारल्याने आज रॅली स्थगित करावी लागली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी जेष्ठ शिवसैनिक हरीश असर, रऊफ मिर्झा, गोविंद रसाळ, माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, विनय आहेर, लियाकत शेख, किरण शिंदे, महेंद्र शिरसाठ, दिलीप  तेजवाणी, कैलास गवळी, सुरेखा मोरे, सुनील गवळी, हर्षल भाबड, अमीन पटेल, दिनेश केकान, संतोष जगताप, कयाम सय्यद, एड. सुधाकर मोरे, युवासेनेचे पदाधिकारी स्वराज देशमुख, अमोल दंडगव्हाळ, विक्की सुरवसे, मुक्ता नलावडे, अशोक पदमर, कैलास भाबड, आशिष घुगे, अंकुश गवळी यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरुद्ध असलेले आंदोलन चिघळू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाला छावणीचे स्वरूप आले होते स्वतः पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह दंगा नियंत्रक पथक, स्थानिक पोलीस बल, तर येवला चांदवड येथून कुमक मागविण्यात आली होती रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे केवळ पुतळ्याजवळ आंदोलन करण्यास सांगण्यात आले होते त्यामुळे आंदोलकांनी रॅली काढू नये यासाठी या चौकातील चारही बाजूंनी रस्त्यांना बॅरिकेटिंग करून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमदार सुहास कांदे यांनी  शिवसेनेशी बंड करून शिंदे गटात सामील झाल्याने  शिवसैनिकांच्या भावना अनावर झाल्या. शहरात रॅली काढण्यात येणार असल्याचे समजताच रॅली मध्ये अनुचित प्रकार घडू शकतो अश्या आशयाचे पत्र शिवसेनेच्या एका तालुका पदाधिकाऱ्याकडून पोलिसांना दिले असल्याची जोरदार चर्चा आहे रॅलीला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या तर मला पोलिसांचे संरक्षण दिले असल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे नेते गणेश धात्रक यांनी सांगितले दरम्यान ज्यांनी पत्राद्वारे रॅलीत अनुचित प्रकार घडेल असे वक्तव्य केल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी उचलले नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या