मनमाड ता ७ जून रोजी जाहीर होणारी मनमाड नगरपरीषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या कार्यक्रमात अंशतः बदल करण्यात आला आहे.त्यामुळे इच्छुकांना आपल्या वार्डाची प्रभाग रचना कशी झालेली असेल हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना ९ जून नंतर जाहीर केली जाणार आहे.यापूर्वी मनमाड नगरपरीषदेच्या प्रभाग रचनांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपरीषद प्रशासनाने जाहीर केला.त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.मनमाड शहरातून या प्रारूप प्रभाग रचनेवर आणि आराखड्यावर १८ हरकती आणि सूचना दाखल झाल्या होत्या.मुदतीनंतर जिल्हा प्रशासनाने या हरकती आणि सूचनाची पाहणी करून तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता.या अगोदर जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार मनमाड नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना ७ जून रोजी जाहीर करण्यात येणार होती.परंतु त्यात आता बदल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार नगर परीषदच्या अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा ७ जून रोजी जाहीर करण्याचे निश्चित केले होते.परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. अधिनियमातील कलम १० नुसार पालिकांची प्रभाग रचनेची अधिसूचना राजपत्रात तसेच स्थानिक वृत्तपत्रात जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरीषदेंच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेत बदल करण्यात आला आहे.अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी आता ७ जून ऐवजी ९ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या