जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची बैठक मालेगाव येथे संपन्न..
नाशिक -जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची बैठक 19 रोजी मालेगाव विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्हा कार्यकारणी निवडीसह कार्यकर्त्यांना संघटित करण्यासोबतच कामकाजाबाबत दिशानिर्देश करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक पार पडली.
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत या समस्येवर तोडगा काढण्याबाबत बैठकीत उपस्थितांनी आपापले विचार मांडले. केंद्रसरकारने ऑक्टोबर २००५ मध्ये हा कायदा करून सर्व देशभर हा कायदा लागू केला. काही अपवाद आणि फरक वगळता सदर केंद्राचा कायदा महाराष्ट्रासह केंद्रात व राज्यात देशभर लागू आहे.
जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी इमानेइतबारे लढा देणारे कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते. भ्रष्टाचाराविरोधात इमानेइतबारे लढा देणा-या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची चाचपणी करून येत्या आठवडाभरात जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येणार असल्याचे द्यानद्यान यांनी सांगितले.
बैठकीत प्रदिप पहाडे, साहेबराव वाघ, षुरूषोत्तम धांडे, पंढरीनाथ कनोर, योगेश निकम, पंकज पाटील, हिरामन कचवे, रामदास बच्छाव, गनी शाह, आप्पाजी जगताप, अंबुदादा निकम, चेतन परदेशी, प्रकाश वाघ, गोरख त्रिभुवन, शंकर वाळके, संजीवन वाघ, प्रदिप ठाकरे, प्रमोद गांगुर्डे, रविंद्र जाधव, संभाजी सावंत, अजय कट्यारे, युवराज आहेर, चेतन ढिवरे, विनायक माळी, नंन्दू ठाकरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या