महर्षी वाल्मिकी नगर,ईदगाह,स्वीपर कॉलनी,हे मनमाड शहराचे भाग नाही का .? मंग वारंवार विकास कार्याची मांगणी करून सुद्धा सदर भाग हे विकासा पासून वंचित का,?
मनमाड:- महर्षी वाल्मीकी नगर, ईदगाह स्वीपर कॉलनी येथे राहत असलेल्या जनता ही बऱ्याच वर्षा पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सोई-सुविधा पासून वंचित आहे,रहिवासी नागरिकांना अनेक अडचणी सामना करावा लागत आहे, ईदगाह स्वीपर कॉलनी येथे रहदारीसाठी असलेला सांडवा पुल हा सन 2019 2020 साली आलेल्या पुरात वाहुन गेला आहे, त्यानंतर तेथे मातीचे भर करून तात्पुरत्या स्वरुपात वाहतुक सुरळीत केली, तरी मातीच्या भरामुळे पुलाची दुरुस्ती झाली नसुन तेथे अपघाताची शक्यता टाळता येत नाही. तुटलेल्या पुला मुळे तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.नाईलाजाने लोक आपला जिव मुठीत धरून येथून जा ये करीत असतात. तरी तेथे कॉकेटीकरणाचे काम त्वरीत करणे गरजेचे आहे, तसेच, पांझन नदी पात्रात घाणीची साम्राज्य आहे. त्यामुळे डास मच्छर मुळे डेंगू चिकणगुणिया रोग पसरत आहे,या भागातील जनतेच्या आरोग्या प्रश्न हा ऐरणीस आला आहे.
मनमाड शहरात ठिक ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवलेले असतांनाही महर्षी वाल्मिकी नगर, ईदगाह, स्वीपर कॉलनी परिसरात ते बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या भागात नेहमी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, रहिवासी नागरिकांना रात्री बेरात्री अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अंधारामुळे या भागात,चोरींमारीचे प्रकार देखील वाढले आहे.तसेच
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता जरी होत असली तरी या भागातील सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे गळुन पडलेले आहे. महर्षी बाल्मीकी नगर, ईदगाह स्वीपर कॉलनी भागात जनतेला असे अनगीनत समस्यांना सामोरे जावे लागत आहे,
या सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण(निवारण) करण्यात यावे या साठी आम्ही मनमाड नगरपरिषद मुख्यधिकारी साहेब यांना ,दि.09/04/2022.रोजी निवेदन देले आहे, तरी देखील नपा,प्रशासना तर्फे कारवाई झालेले नाही, या सर्व उदासनियता मागे जबाबदार अकार्यक्षम नेतृत्व असलेले अधिकारीच आहे,
तरी संबंधित नपा अधिकारी यांनी आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा या भागातील नागरिकांना वर्ष नू वर्ष त्रास सहन करावेच लागेल,नाईलाजाने आम्हाला वरिष्ठ कार्यालयास तर्फे दाद मांगावी लागेल, तरी जबाबदार असलेल्या अधिकरिंनी गांभीर्य नोंद घ्यावी,अशी माहिती निवेदन देणारे,आशिष संजय चावरीया यांनी जन आवाज न्युज ला दिली आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या