Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात साजरी.



मनमाड ता ३ - ईद-उल-फ़ित्रं अर्थात रमजान  ईद मनमाड शहर व परिसरात पारंपरिक पध्द्तीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने ईदगाहसह शहरातील सर्वच मस्जिदमध्ये ईदची नमाजपठण करण्यात आले तर सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या



येथील ईदगाह मैदानांवर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली  ईदची सामूहिक नमाजपठणाचा कार्यक्रम करण्यात आला यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्थेचे नियोजन केले होते. समता, बंधुभाव आणि एकात्मता रहावी यासाठी दुआ करत ईद साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांत मोठ्या उत्साहाचे वातावरण होते तर शिरखुर्मा देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. मुस्लिम बांधवानी कब्रस्तानमधे जाऊन आपल्या पुर्वजासाठी दुवा पठन केली ईदगाह मैदानावरील सामुदायिक नमाज झाल्यानंतर मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, मंडल अधिकारी श्री नरोटे आदींनी मुस्लिमबांधवांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या नमाज पठण करून येणाऱ्या मुस्लिम बांधवांचा गुलाब पुष्प देत स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रम शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, अमिन पटेल, जाफर मिर्झा, चेतन सांगळे,  संदीप सांगळे, राजू सांगळे, राहुल सांगळे, सचिन दरगुडे, मुन्नाभाऊ दरगुडे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, आदी उपस्थित होते.



मनमाड : ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना मान्यवर तर दुसऱ्या छायाचित्रात नमाज पठण करतांना मुस्लिम बांधव 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या