Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 भीमोत्सवतर्फे एक आगळीवेगळी वैचारिक सांस्कृतिक विचारांची डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी.
मनमाड : पोवाडे सादर करतांना शाहीर शाहीर प्रसाद विभूते आणि शाहीर निशांत शेख


मनमाड ता १२ - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराक्रमांचे, कार्यकर्तृत्वाचे पोवाडे आपल्या विशेष शैलीत सादर करून शाहिर निशांत शेख आणि शाहीर प्रसाद विभूते यांनी महापुरुषांचे विचार आपल्या शाहिरीबाज गीतातून प्रबोधन करत भीमोत्सवाच्या गाथा भिमाची या कार्यक्रमाच्या वातावरणात स्फूर्ती निर्माण केली


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात ११ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत भरगच्च प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत (ता ११ रोजी सायंकाळी) येथील एकात्मता चौकात राष्ट्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहिर आदिनाथ बापूराव विभूते यांच्या शाहीर प्रसाद विभूते आणि शाहीर निशांत शेख यांचा 'गाथा भिमाची' हा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला भीमोत्सवतर्फे एक आगळीवेगळी वैचारिक सांस्कृतिक विचारांची डॉ आंबेडकरांची जयंती साजरी केली जात असून सहा दिवस मनमाडकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी देत आहे हातात डफ धरलेल्या व डोक्यावर फेटा बांधलेल्या दोन्ही शाहिरांनी ललकारी ठोकत महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून दिली लोककलेचं संवर्धन आणि बाबासाहेबांचं गुणगान असा दुहेरी बाज सादर करत शाहिरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग ताकदीने सादर केला आवेशपूर्ण मुद्राभिनयाने व भारदस्त आवाजामुळे या पोवाड्याला वेळोवेळी टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर शाहीर प्रसाद विभूते यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहीली ही छक्कड गाऊन रत्नाची खाण असणा-या मैनेचे वर्णन आपल्या शैलीने खुमासदारपणे सादर केले

भिमाई च्या वासराचा, रामजीच्या लेकराचा, पायगुण असा भारीभारी, जागा केला जगजेठी गा .., जग बदल घालुनी घाव सांगूंनी गेले मला भीमराव .., ओव्या, गीते, कवने सादर केली तर विविध पात्र उभारून समाजातील अंधश्रद्धेवर कडाडून असूड ओढले तर अशा प्रबोधनात्मक विचार मांडत तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आधुनिक युगातही किती महत्वाचे आहे असा प्रबोधनात्मक विचार मांडत जनजागृती केली यावेळी शाहिरी कलापथकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले भीमोत्सव  चे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अमोल खरे, अनिल निरभवणे, प्रा डॉ जे वाय इंगळे, संजय कटारे, रवी गायकवाड, निलेश वाघ, सतिष केदारे, सुनील मायर, मनोज ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिकजन  उपस्थित होते  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या