प्रभाग क्र.४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भोगवटदार वर्ग २ उतारे मिळण्याकरीता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात : गुरुकुमार निकाळे.
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड.प्रभाग क्र. 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण कायम करण्यासाठी वेळोवेळी भुमीअभिलेख कार्यालय व नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधून, प्रसंगी आंदोलन करून अखेर या कामाला यश आले असून प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली आहे. परिसरातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे कायम करुन भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळून पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी दि.7/4/2022 रोजी 8/4/2022 रोजी भुमीअभिलेख कार्यालय व मनमाड नगर पालिकेच्या वतीने दि.7/4/2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जागेची मोजणीकरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उपस्थितीत झाली त्याप्रसंगी मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल व संपूर्ण भुमी अभिलेख प्रशासन उपस्थित होते त्याप्रसंगी नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, संजय टेलर, बाळू गवळे, सुभाष पवार, रविंद्र पगारे, शैलेश जगताप, बॉबी पवार, गोटू भालेराव, आकाश निकम, सोनु गवळे आदींसह वार्डातील रहिवाशी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी व भुमिलेख अधिकारी व उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाचे आभार रिपाई तालुका युवक अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी व्यक्त केले.
मोजणी सुरु झाली तरी येथील रहिवाशांना प्रत्यक्ष भोगवटादार वर्ग 2 चे उतारे प्रत्यक्ष मिळण्यासाठी अजून विविध शासकीय विभागांच्य परवानग्या व इतर कामे बाकी असून त्यासर्व बाबींचा पाठपुरावा करुन लवकरच रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे देऊन त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार असून त्यांचे हक्काचे चांगले घर निर्माण होणार आहे. या चांगल्या कामामध्ये कुणीही राजकारण न करता निस्वार्थपणे रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर उभे रहाण्याकरीता आपले योगदान द्यावे असे आवाहन गुरुकुमार निकाळे यांनी केले आहे.



0 टिप्पण्या