Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून १ लाख प्रकरणातून ७.६६ लाख रूपयांची रक्कम दंडात्मक वसुली .

मनमाड प्रतिनिधी.

मनमाड : मध्य रेल्वेने फुकट्याप्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून १ लाख प्रकरणातून ७.६६ लाख रूपयांची रक्कम दंडात्मक वसुली प्रशासनाने केली.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या आर्थिक वर्षात तिकिट तपासणीदरम्यान ८ लाख ६५ हजार केसेसमधून ६२.६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.४४ कोटीची महसूल गोळा करणारे भुसावळ स्थानक विभागात अव्वल ठरले आहे.सुमारे ७१ लाखांच्या दंडवसुलीसह नाशिक रेल्वेस्थानक चौथ्या स्थानी आहे.
                     कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वे मंत्रालयाने देभरात विशेष कोविड रेल्वेगाड्या सुरू केल्या.या गाड्यांमधून केवळ आरक्षित तिकिटावर प्रवासाची मुभा प्रवाशांना देण्यात आली.मात्र त्यानंतर अनेक प्रवाशांनी विनातिकिट , तिकिट कन्फर्म नसतांना प्रवास करणे व एका रेल्वेच्या तिकिटावर दुसऱ्याच गाडीने प्रवास करण्याचे प्रकार घडले.त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात रेल्वे मंत्रालयाने मोहीम राबविली त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. 
                  मध्य रेल्वेने भुसावळ विभागात खंडवा ते इगतपुरी मार्गावर तिकिट तपासणी मोहीम राबवली.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत विभागात ८ लाख ६५ हजार प्रकरणांची नोंद झाली.या प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून ६२.६ कोटींची रक्कम वसूल केली . विभागात दंडवसुलीत भुसावळ रेल्वेस्थानकात ५.८७ लाख प्रकरणांतून रेल्वेला ४४ कोटी रूपयांचा महसूल मिळाला.त्याखालोखाल खांडवा रेल्वेस्थानकात १.३ लाख प्रकरणांमधून ८.६ कोटी तर मनमाडला १ लाख प्रकरणांतून ७.६६ रूपयांची रक्कम मिळाली. नाशिकरोड स्थानकाने १२.७६१ प्रकरणांमधून सुमारे ७१ लाखांची दंडवसुली केली.कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होती.त्यामुळे तिकिट तपासणीसाठी कर्मचारीवर्ग वाढविला होता , अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या