Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बँक परिसरात आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा.

मनमाड प्रतिनिधी.

मनमाड : आर्थिक वर्षाच्या पहिल्या सुरुवातीलाच बँकांमध्ये तोबा गर्दी होत आहे.मार्च एंडच्या सलग आलेल्या सुट्यांमुळे बँका सलग तीन दिवस बंद होते. मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्तहात शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये तळपत्या उन्हात आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरीकांनी रांगा लावल्याने सर्वच बँकामध्ये सध्ये हाऊस फुल असल्याचे चित्र दिसून येत आहे.



 गुरूवारी मार्चअखेर म्हणजे ३१ मार्च असल्याने आपले सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून आली.शुक्रवारी १ एप्रिल रोजी बँक क्लोजींग डे मुळे आर्थिक व्यवहार होते.तर शनिवारी वर्षप्रतिपदा गुढीपाड्या निमित्त आणि रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद होत्या.                  सोमवारपासून बँका सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशी सर्व बँका मध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळली बँक परिसरात आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या मंगळवारी हेच चित्र दिसून आले.मनमाड हे कामगार वर्गाचे शहर आहे.महिनाअखेरीस आणि १ तारखेपासून विविध विभागाचे वेतन तसेच निवृत्ती वेतन घेण्यासाठी आणि आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकामध्ये गर्दी उसळते.१० ते १२ तारखेपर्यंत सर्वच बँकेमध्ये गर्दीचे चित्र दिसून येते.पण यंदा सलग तीन सुट्या लागून आल्याने जास्तच गर्दी झाल्याचे बँका व पोस्ट कार्यालयात दिसून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या