गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव उत्साहात साजरा. 




गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पालक संघटने तर्फे उपाध्यक्ष श्री कय्युम शेख श्री. अनुप बेदमुथा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते तसेच शाळेचे सेक्रेटरी श्री. पराग पाखले, मुख्याध्यापक श्री. रॉल्फी सर , उपप्राचार्य श्री.नितेश पाटील यांनी शिक्षकांच्या व पालकांच्या उपस्थितीत दोघी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली .विद्यार्थ्यांनी दोघी महापुरुषांबद्दल खूप छान माहिती दिली. पालक समितीचे उपाध्यक्ष कय्युम शेख यांनी संविधान ची निर्मिती करणारे बाबासाहेब यांचे संविधान बद्दल चा अभ्यास व त्यांचे विचार शालेय अभ्यासक्रमात यायला हवे    आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुप बेदमुथा यांनी भगवान महावीर चे आताच्या विज्ञान व कोरोना मध्ये त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे झाली याच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शालेय शिक्षिका सौ.चंद्रप्रभा जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वीतेसाठी आशिष धात्रक सर ,देशपांडे सर इत्यादी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.