दारूच्या नशेत भावाने बहिणीला शिवीगाळ केल्याने आलेल्या रागातून बहिणीने आपल्या स्वतःच्या भावाला चाकूने भोकसल्याने भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी शहरातील विवेकानंद नगर नंबर 2 या भागात घडली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते
मनमाड शहरात असलेल्या विवेकानंद नगर २ परीसरात संदीप उर्फ बाळू गोंगे हे राहत होता काही महिन्यांपूर्वी त्यांची श्रीरामपूर येथे राहणारी बहीण शोभा गारुडकर हिची मुलगी वारली होती त्यामुळे शोभा या काही दिवस आपल्या माहेरी आईकडे राहायला आल्या होत्या भाऊ बाळू हा सतत दारूच्या नशेत असायचा आजही तो दारू पिऊन आल्यामुळे त्याने घरात बहिणीला शिवीगाळ केली दोघांचे भांडण झाले भावाने शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे सदर बहिणीने भावाला धाक दाखविण्यासाठी किचनमध्ये असलेला चाकू आणून भावाला दाख दाखवत होती मात्र या धाक दाखवण्याच्या नादात बहिणीच्या हातातील चाकू भावाच्या पोटात घुसल्यामुळे तो आरपार गेला घाव गंभीर स्वरूपाचा लागल्याने रक्तस्राव जास्त झाला आणि भावाचा जागीच मृत्यू झाला भावाचा आपल्या हातून खून झाल्यामुळे बहीण शोभा गारुडकर (वय ५५, रा श्रीरामपूर) ही थेट पोलीस स्थानक गाठून घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जागेचा पंचनामा केला सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे तपास पाहत आहे
मनमाड : शहरातील विवेकानंद नगर नंबर २ भागात खुनाच्या ठिकाणी पाहणी करतांना प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह पोलीस पथक
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या