बाळांनो तुम्ही शिका,भविष्यात तुम्हाला संघटित होऊन समता,व न्यायहक्का साठी संघर्ष करायचे आहे.



बाळांनो तुम्ही शिका,भविष्यात तुम्हाला संघटित होऊन समता,व न्यायहक्का साठी संघर्ष करायचे आहे.



सिम्बॉल ऑफ नॉलेज,भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी मनमाड तर्फे मौलाना अब्दुल कलाम नगर परिषद शाळेतील गरजू विद्यार्थींना वह्या व पुस्तके शालेय साहित्य वाटप करण्यात आले,


मनमाड: सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी नेहमी बहुजन समाज्याला शिक्षणाचा महत्व समजुन दिलेला आहे, 


शिका,संघटित व्हा,संघर्ष करा, बोलतांना बाबा साहेब आंबेडकरांनी शिक्षणाला पहिला महत्वाचा स्थान  दिला आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो कोणी प्राशन करेल,तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, 

 बाबा साहेबांचे असे अनेक वाक्य शक्षणाचे महत्व पटवून देणारे आहे, 


  वंचित बहुजन आघाडी तर्फे सिम्बॉल ऑफ नॉलेज,डॉ बाबा साहेब आंबेडक जयंतीला कुठलाही बोर्ड बैनर DJ चा वायफळ खर्च न करता, मौलाना अब्दुल कलाम आझाद,ईकरा उर्दू नगरपरिषद शाळेत आर्थिकदृष्ट्या दुरबल गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे,

या वेळी शहराध्यक्ष ऍड आम्रपाली निकम, जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आ,शहर सचिव अनवर मंसुरी,शहर उपाध्यक्ष अमोल केदारे,अतुल वानखेडे, व इतर पदाधिकारी उपस्तीत होते,