"भीमोत्सव 22" चा 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या महानाट्याने समारोप..
मनमाड : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी शहरावासीयांना नावाजलेल्या कार्यक्रमांची मेजवानी देऊन भीमोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.
यंदाच्या वर्षी देखील दिनांक 11 एप्रिला शाहिरी जलसा , 12 एप्रिला जागर समतेचा आणि 16 एप्रिला भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्य या नावाजलेला कार्यक्रमांचे आयोजन "भीमोत्सव 22" ला आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते , या सर्व कार्यक्रमांना शहरातील भीम प्रेमींनी भर-भरून दाद देऊन उपस्थिती लावली.
महामानव , भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय संघर्षमय जीवनावर आधारित 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या चाळीस कलाकारांच्या अतिशय जीवंत असणाऱ्या अभिनयाने नटलेल्या या महानाट्याने मनमाडकरांची मने जिंकुन घेतली , दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस परेड ग्राऊंड येथे प्रा.प्रकाशकुमार मधुकर वाघमारे दिग्दर्शित भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याचे आयोजन भीमोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते .बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिन होण्यापर्यंतचे सर्व जीवन प्रसंग या महानाट्यामध्ये दाखवण्यात आले . बाबासाहेबांचा जन्म , शिक्षण घेत असताना केलेला संघर्ष , त्या काळातील जाती व्यवस्था , उच्च शिक्षण घेण्यासाठी केलेले अथक प्रयत्न , चवदार तळ्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेला संघर्ष , काळाराम मंदिर प्रवेशासाठी करण्यात आलेले आंदोलन , भारत देशाच्या संविधान निर्मितीसाठी घेण्यात आलेली दिवस-रात्रीचे कष्ट , महापरिनिर्वाण दिन आदी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाचे प्रसंग या नाटकातील कलाकारांनी अतिशय उत्तम रित्या सादर केले , नाटक बघत असतांना उपस्थित प्रेषकवर्ग भावुक होऊन नाटकातील घटना प्रत्यक्ष अनुभवताना आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.
"भीमोत्सव 22" च्या सर्वच कार्यक्रमांना शहरातील मान्यवर , भीमोत्सवाचे देणगीदार , भीमप्रेमी आणि नागरिकांनी भर-भरून साथ देऊन उपस्थिती लावल्या बद्दल
भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.





0 टिप्पण्या