Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात जागतिक महिला दिंन उत्साहात साजरा.

                    

म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व महिला विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या कुमारी वैभवी वाजे, कु. प्रांजली धीवर तसेच क्रीडा विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कुमारी दिव्या व्यवहारे, कु.साक्षी पांडे, करुणा गाडे, निकिता दराडे, खुशाली गांगुर्डे, इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये सिलेक्शन झालेली कुमारी वैष्णवी नाबरिया एनसीसी मध्ये बेस्ट  परफॉर्मन्स केलेल्य नाबरिया वैष्णवी व मढे वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या वकील.सौ. आम्रपाली निकम होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्राचीन काळापासून तर आजपर्यंत महिला व त्यांच्या समस्या तसेच महिलांचा विकास इत्यादी मुद्यांना अनुसरून मार्गदर्शन केले. आज संपूर्ण जगभर महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. घटनेतील केलेल्या तरतुदी यांच्या संरक्षणासाठी कवचकुंडले आहेत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून स्त्रीयांना समानतेचे हक्क देण्यात 1789 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती प्रेरक ठरली. कारण त्या क्रांतीचा आधार होता "स्वातंत्र्य, समता,आणि बंधुत्व या क्रांतीच्या घोषवाक्या ने स्त्री वर्गात जागृती निर्माण झाली .त्यानंतर भारतातील राजा राम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,महर्षी धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे असे अनेक समाजसुधारक पुढे आले आणि स्त्रीमुक्तीसाठी नवा विचार मांडला आणि प्रसंगी आंदोलनेही केली. असे विचार मांडले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला वर्गाची विद्यार्थिनी वैभवी वाजे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास समिती अध्यक्ष प्रा कविता काखंडकी यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय श्रीमती आरती  छाजेड व सुप्रिया शिरसाठ यांनी आभाप्रदर्शन केले. संयोजन श्रीमती वर्षाराणी पेढेकर यांनी केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी. जी.आंबेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती ज्योती पालवे कुलसचिव श्री  समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या