Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात  कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त 'बौद्धिक स्वामित्व हक्क' या विषयावर कार्यशाळा संपन्न.


मनमाड प्रतिनिधी.

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर व अदिवासी सेवा समिती  या  संस्थांचे संस्थापक, थोर   स्वातंत्र्यसेनानी, कुळ कायद्याचे जनक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कर्मवीर हे वकिली व्यवसाय करत असताना वकिली व्यवसाय सोडून त्यांनी   स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदवून कारावासही भोगला तसेच शिक्षण, सहकार व राजकारण या क्षेत्रात स्वत:ची विद्वत्ता सिद्ध केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत सिंहाचा वाटा, शेतकी, वन व महसूल खात्याचे मंत्री असताना शेतक-यासाठी वरदान ठरलेला ऐतिहासिक  कूळकायदा तयार करून त्याची अंमलबजावणी केली.  सहकाराचे कार्यतत्व स्वीकारून  नाशिक जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, गिरणा सहकारी साखर कारखाना, शेतकी संघ अशा अनेक संस्थांची उभारणी केली तसेच आदिवासी व ग्रामीण भागातील मूलांच्या शिक्षणासाठी  आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थांची स्थापना करुन नाशिक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे समाजवादाचे खरे पुरस्कर्ते आहेत.                               तसेच मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'बौद्धिक स्वामित्व हक्क' या विषयावर गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्यातर्फे कार्यशाळा आयोजित  करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ. जयवंत भदाणे यांनी पेटंट, काॅपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक स्थानाचे महत्त्व  बौद्धिक स्वामित्व हक्कात कसे आहे. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी जी आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे,  पर्यवेक्षक डॉ सतीश तांबे, प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षाराणी पेडेकर, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय  डॉ आर एस काळे व व आभार नॅक समन्वयक डॉ मिलिंद अहिरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या