Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रम.

मनमाड प्रतिनिधी. राजेंद्र धिंगाण.

आज मनमाड नगरपरिषदमार्फत मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोविंद सिंग स्कुल मध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नगरपरिषदच्या वतीने ऑनलाइन चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.

याच स्पर्धेचा निकाल आज या शाळेमध्ये घोषित करण्यात आला. या सर्व गोष्टीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सुतार सर यांचे अनमोल सहकार्य मिळाले.



सदर स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागपर प्रमाणपत्र   कार्यक्रम नगरपरिषदमधील आरोग्य निरीक्षक मा. विजय सोनवणे सर, शहर समनव्यक मयूर दुसे, संदिप भोरे यांच्या हस्ते देण्यात आले. नगरपरिषदच्या वतीने श्री सतिश चावरीया, दिनेश करोसिया, अशोक पाईक, विशाल बहोत तसेच इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल सर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या