सारे जहाँ से अच्छा,हिंदोस्ताँ हमारा,
मनमाड शहर गुरुद्वारेत राष्ट्रीय एकात्मता संदेश कार्यक्रम,
मनमाड प्रतिनिधी.
मालेगाव येथील सत्य मलिक लोकसेवा ग्रुप व मनमाड येथील फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या संयुक्त विद्यमाने शहरातील गुरुद्वारा गुप्त सर येथे राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम साजरा करण्यात आला, या वेळी डॉक्टर नसीम अख्तर साहेब (पंजाब) व गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह यांची देशहितासाठी धार्मिक व राष्ट्रीय एकता व एकात्मता संबधी महत्वपूर्ण चर्चा झाली, या कार्यक्रमात शहरातील नागरिकांना देखील धार्मिक, व राष्ट्रीय एकात्मताची खूप मोलाची माहिती मिळाली,
सांयकाळ ची नमाज(मगरीब) वेळ झाल्याने गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह साहेबां तर्फे मुस्लिम बांधवांसाठी गुरुदरा मध्ये नमाज पठणाची व्यवस्था करण्यात आली व मुस्लिम बांधवांनी देखील गुरुद्वारा येथे नमाज पठण केली,या कार्यक्रमा तर्फे राष्ट्रीय एकात्मतेचा खूप चांगला संदेश मिळाला आहे, या वेळी डॉ नसीर अख्तर (पंजाब),डॉ तौहिद मालेगाव,फिरोज शेख,डॉ शब्बीर, कादिर शेख,नसीम भाई, मो,अख्तर, जावेद इंजिनियर,निहाल अहेमद, मुजम्मील रहीमी,जिशान अहेमद, इतर बांधव उपस्थीत होते,

0 टिप्पण्या