मनमाड नगरपरिषदेच्या निवडणूकांचा श्रीगणेशा... शहराची प्रभाग रचना जाहीर.
बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003.
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड : मनमाड नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आज निवडणूक आयोगच्या वतीने मनमाड शहराची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली .
या प्रभाग रचनेनुसार एकुण 80,058 मतदार असुन एकुण 16 प्रभागामध्ये 33 नगरपालिका सदस्य असणार आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकुण 3 सदस्य असणार आहे. प्रभागाची रचना आणि एकुण मतदार संख्या पुढील प्रमाणे :-
● प्रभाग क्रमांक : 1 , एकुण मतदार संख्या 4764 , समाविष्ट भाग : हनुमान नगर ,तिवारी वाडी , भाबड वस्ती, डोणगाव रोड परिसर , सगळे गॅस पंप मागील भाग , शिक्षक कॉलनी , विवेकानंद नगर
●प्रभाग क्रमांक : 2 , एकुण मतदार संख्या 4822 , समाविष्ट भाग :आंबेडकर नगर , सिकंदर नगर , किर्ती नगर , कोतवाल नगर ,बुरुकुलवाडी भाग
●प्रभाग क्रमांक : 3 , एकुण मतदार संख्या 5077 , समाविष्ट भाग : पॉवर हाऊस औद्योगिक वसाहत , एफ.सी. आय.कॉर्टर , गर्डर शॉप , सटाणा रोड , चंदन वाडी
●प्रभाग क्रमांक : 4 , एकुण मतदार संख्या : 4995 , समाविष्ट भाग : विवेकानंद नगर नं.1 , आंबेडकर चौक , आंबेडकर बोर्डिंग , माऊली नगर , सिद्धार्थ हौसिंग सोसायटी
●प्रभाग क्रमांक : 5 , एकुण मतदार संख्या : 4822 , समाविष्ट भाग : बुधलवाडी , राजवाडा , माधव नगर ,मुरलीधर नगर , पांडुरंग नगर , सनजीत हौसिंग सोसायटी , विवेकानंद नगर इत्यादी.
●प्रभाग क्रमांक : 6 , एकुण मतदार संख्या : 4372 , समाविष्ट भाग : आय. यु.डी. पी. , प्रोफेसर कॉलनी , मनोरम सदन भिंत , ललवाणी रो-हाऊस प्लॉट , गुजर कोचिंग क्लासेस
●प्रभाग क्रमांक : 7 , एकुण मतदार संख्या : 4429 , समाविष्ट भाग : टक्कार मोहला , मनोरम सदन झोपडपट्टी , हुसेनी चौक ,जामा मस्जिद परिसर , कोर्ट रोड , नुर चौक परिसर , राजवाडा , रोहिदास वाडा , कुंभार वाडा , शनी मंदिर , बालाजी मंदिर , भिलाटी परिसर
●प्रभाग क्रमांक : 8 , एकुण मतदार संख्या : 5096 , समाविष्ट भाग : डीसोझा मैदान , बोहरी कंपाऊंड , पोलीस कॉर्टर , रेल्वे वर्कशॉप परिसर , नजराना सोसा., हबीब नगर , आनंद वाडी भाग ,
कारंडे वाडी , क्रांती नगर इत्यादी.
●प्रभाग क्रमांक : 9 , एकुण मतदार संख्या : 4601 , समाविष्ट भाग : मुक्तांगण परिसर , गांधी चौक परिसर , रेल्वे स्टेशन परिसर , माणके कंपाउंड , सराफ बाजार
●प्रभाग क्रमांक : 10 , एकुण मतदार संख्या : 4554 , समाविष्ट भाग : जमधाडे चौक , 52 नंबर , फुले चौक भाग परिसर , ललवाणी बिल्डींग परिसर , सावित्रीबाई फुले मार्केट इत्यादी.
●प्रभाग क्रमांक : 11 , एकुण मतदार संख्या : 4601 , समाविष्ट भाग : गवळी झोपडपट्टी , नेहेरू भवन , गुरुद्वारा परिसर , आनंद विहार परिसर , स्वीपर कॉलनी , इदगाह परिसर
●प्रभाग क्रमांक : 12 , एकुण मतदार संख्या : 4905 , समाविष्ट भाग : संभाजी नगर , वसंग हौसिंग सोसायटी , हुडको परिसर , केशव हाऊसिंग सोसायटी , शिवाजी नगर नंबर 1 , सिद्धिविनायक नगर , डी. के. पगारे नगर
●प्रभाग क्रमांक : 13 , एकुण मतदार संख्या : 5277 , समाविष्ट भाग : हुडको भाग , कुलथे कॉलनी , केकाण नगर , दरगुडे वस्ती , आश्विनी नगर , शिवाजी नगर नंबर 2 , महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी
●प्रभाग क्रमांक : 14 , एकुण मतदार संख्या : 4788 , समाविष्ट भाग : रमाबाई नगर , भारत नगर , रेल्वे कॉलनी , पंचवटी विभाग , वडार वस्ती , रेल्वे स्टेशनचा लागुन दक्षिण भाग
●प्रभाग क्रमांक : 15 , एकुण मतदार संख्या : 5338 , समाविष्ट भाग : शकुंतला नगर , बेंद्रे चाळ , सर्व्हे नंबर 153 , सर्व्हे नंबर 141 , 28 युनिट , कातकडे वस्ती , ट्रेनिंग कॉलेज परिसर , शाळा नंबर 14 , कॅम्प विभाग
●प्रभाग क्रमांक : 16 , एकुण मतदार संख्या : 7617 , समाविष्ट भाग : शांती नगर , महानंद नगर , श्रावस्ती नगर , गोपाल नगर , वेलकंणी नगर , आदर्श नगर , जनार्दन नगर , कॅम्प पश्चिम भाग.
या प्रमाणे प्रत्येक प्रभागाची व्याप्ती , एकुण मतदार संख्या आणि समाविष्ट भागाची संपूर्ण माहिती आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत करण्यात आली आहे.
आज मनमाड नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने नगरपरिषदेमधील आपले भावी नगरसेवक होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार आणि राजकिय पक्ष सक्रिय झाले आहे .

0 टिप्पण्या