Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 सिकंदर नगर उर्दू शाळा क्र.१८ला स्थानिक शिष्टमंडळाची भेट.



मनमाड.सिकंदर नगर उर्दू शाळा क्र.१८ला स्थानिक शिष्टमंडळाची भेट   दि.८/२/२०२२ मंगळवार रोजी सिकंदर नगर भागातील स्थानिक नागरिकांनी शाळेला भेट दिली व कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते तसेच कोरोना काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीची तफावत जाणून घेऊन याची पाहणी करण्यात आली.. विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षक श्री.नईम सर व सलिम सर यांनी मुलांना विविध प्रश्न विचारून चाचपणी केली तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या पाल्यांकडे गंभीर रित्या लक्ष दिल्यास आणि आपली जबाबदारी पार पाडल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान वाचेल. तसेच शिक्षण मंडळाने संगणक ज्ञान, मानसिक  विकासा बरोबर शारीरिक आणि सर्वांगीण विकास होईल त्यासाठी  आवश्यक ते संगणक व क्रिडा साहित्य उपलब्ध करुन द्यावे असे मनोगत खालिद शेख यांनी व्यक्त केले. या प्रसंगी हाफिज साकिब मौलाना, लतिफ मनियार, हनिफ शेख, आकिब शेख व हारिस शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या