मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . सचिन कुमार पटेल आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांचा मार्गदर्शनाखाली .
मनमाड प्रतिनिधी. राजेंद्र धिंगान.
1) अर्चना सर्व्हिसेस च्या टीम ने महावीर पंत, निल गणेश मंदिर, मारुती मंदिर, गुजराती गल्ली, तांबोळी मस्जिद, कुंभार वाडा, तेली गल्ली, गांधी चौक या परिसरामध्ये 107 भागधारकांची कचरा वर्गीकरण याबाबतीत जनजागृती केली.
या सर्व भागधारकांना कचऱ्याचे घटक समजावून सांगण्यात आले. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा तसेच यामध्ये येणाऱ्या घटकांची सविस्तर माहिती दिली.
कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा तसेच तो इकडेतिकडे उघड्यावर किंवा कचराकुंडीत टाकू नये, तसेच घातक कचरा हा कागदामध्ये गुंडाळून वेगळाच द्यावा अशी माहिती सांगण्यात आली. तसेच ज्या भागधारकांना माहिती देण्यात आली त्यांची सर्व माहिती रजिस्टर मध्ये नोंद केली. यावेळी , शहर समन्यवक मयुर दुसे, राजेंद्र धिंगान , सतिश बहोत सुरेश माळी अन्य आरोग्य निरीक्षक सोनवने यांनी पहाणी दौरा केला
0 टिप्पण्या