मनमाड : मनमाड शहरातील श्री गणेश मंदिर आणि गणेश मंडळांकडून श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मनमाड शहराचे आराध्य दैवत श्री निलमनी गणेश मंदिरामध्ये पहाटे अभिषेक पुजा ,दुपारी श्री सत्यविनायक पुजा आणि रात्री 8 वाजता महाआरती करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले . आय. यु. डी. पी. येथील श्री कमलाक्षय गणेश मंदीरामध्ये सकाळी अभिषेक पुजन ,दुपारी 12 वाजता महाआरती करून श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त मंदिर येथील श्री गणेश मंदीर येथे श्री गणेशाची अभिषेक पुजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आला , खाकीबाग येथील धुम्रकेतु श्री गणेश मंदिरात देखील अभिषेकपुजन आणि प्रसाद वाटप करून श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली.विवेकानंद नगर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये महाअभिषेक , श्री गणेशयाग आणि मिरवणुक काढुन गणेशजयंती उत्सव साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ केंद्र येथे देखील श्री गणेश जयंतीनिमित्त श्री गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ओम विश्वरूप गणेश मंडळ आणि दोस्ती गणेश मंडळ यांच्या सह शहरातील अनेक गणेश मंडळाकडून श्री गणेशाचे पुजन , आरती आणि प्रसाद वाटप करून श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली. या सर्व ठिकाणी श्री गणेश जयंतीच्या कार्यक्रमांना शहरातील गणेशभक्त आणि भाविक हजर होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या