मनमाड:-महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनाखाली कर्करोग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून सध्याचे युग हे नॅनोटेक्नॉलॉजी चे युगआहे या युगात मानवाने सर्वच क्षेत्रात प्रगती केलेली आहे.या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर बऱ्याचशा आजाराचे निदान केलेले आहे आणि त्या आजारावर यशस्वीपणे उपचार केले आहे.परंतु अजूनही कॅन्सर सारख्या आजारावर मानवाला फारशी प्रगती करता आली नाही.असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कविता कातकडे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून कॅन्सर या आजाराची कारणे सांगितली यामध्ये धूम्रपान, पर्यावरण प्रदूषण, अल्ट्रावायलेट किरण, डायट,तसेच हवेतील व्हायरस इत्यादी कारणांमुळे कॅन्सर हा आजार होतो. तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे या आजाराचे लवकर निदान होण्यासाठी सेल्फ एक्झामिनेशन महत्त्वाचे असते.इत्यादी विचार त्यांनी मांडले. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती मोहिनी डोंगरे (समुपदेशक)श्रीमती सुनिता गांगुर्डे (परिचारिका) कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.ज्योती पालवे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे आयोजन करताना करोना नियमांचे पालन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या