Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त अभिवादन.

"गाडगेबाबा यांच्या दशसुत्रीनुसार वाटचाल"
मुंबई, दि. २३ :- संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले.  त्यांची दशसुत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसुत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या