हिजाब घालणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या कर्नाटक सरकारचा वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर निषेध.
संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून अल्पसंख्यांक मुलींना वंचित ठेवण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले,
मनमाड -कर्नाटक या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा)याला काही समाजकंटक विरोध करून मोठ्या प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना मंडळ अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले आहे, अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) यास कर्नाटक राज्य मधील समाजकंटक याला विरोध करीत आहे हिजाब (हेड स्कार्फ) धर्मशास्त्राप्रमाणे महिलांना अत्यावश्यक असून, अनेक पिढ्यांपासून अल्पसंख्यांक समाजातील मुली व महिला हिजाब (बुरखा) परिधान करून शाळेत व महाविद्यालयात देखील जात आहे. आजपर्यंत कोणतेही शाळा व विद्यालयांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना कधीही शाळेमध्ये येण्यास नाकरण्यात आलेले नाही. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वतंत्र दिले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 (1)(अ) अन्वे सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. स्वातंत्र्य भारतात आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुणीही कोणाला कोणते गणवेश घालावे हे कुणीही सांगितलेले नाही, किंवा कोणतेही धर्माचे लोकांनी जे काही गणवेश घातलेले आहे त्याच कधीही विरोध केलेला नाही. परंतु कर्नाटकात मागील काही दिवसापासून संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून सामान्य जनतेला विशेष अल्पसंख्यांक मुलींना वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. कर्नाटक सरकारचे बेकायदेशीर व भारतीय राज्य घटनेच्या विरोधात जाऊन अशा कृत्यामुळे पूर्ण भारतात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येकाला आपल्या जातीय धर्माचा अभिमान असावा कोणत्याही धर्माचा तिरस्कार नसावा. कोणत्याही जाती धर्माची स्त्री चे रक्षण करणे हे आपल्या कर्तव्य असून, आपले राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा सन्मान केला आहे. एकेठिकाणी सरकार हे बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत आहे. परंतु दुसरे ठिकाणी एक स्त्री बघून शंभर ते दोनशे समाजकंटक त्या मुलीला बुरख्यात हिजाब पाहून घोषणाबाजी देत आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही, तरी अशा समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर घटनेचा मुस्कान नामक अल्पसंख्यांक मुलीचा चित्रीकरण (VDO) सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या मुलीस हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, म्हणून सदर मुलीला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे,कैलास शिंदे,पीआर निळे,संतोष भोसले,ऍड आम्रपाली ताई निकम,कादिर शेख,अनवर मंसुरी,यशवंत बागुल,शकील शेख, आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या