पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण श्री सचिन पाटील यांना चांदवड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खुन्याच्या गुन्हातील आरोपींची गुप्तबातमीदाराकडुन बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक समीर बारावरकर, नेमणुक चांदवड पोलीस स्टेशन यांना सांगुन तात्काळ कार्यवाही करणेबाबतचे आदेश दिले. पथकांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या संशयीत इसमाची माहिती घेवून गंगावे ता. चांदवड येथे जावुन आरोपी नामे दत्तात्रय विश्वनाय उबाळे यांची चौकशी केली असता आरोपी हे गावात असल्याचे प्राथमिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा गावात मिळून आला, पोलीस पथकाने गुन्हयातील मयत अनिल रतन आहिरे या बाबत चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे दिली, पोलीस पथकाला त्यांची शंका आल्याने गुन्हयाबाबत आरोपी कडे सखोल चौकशी करण्यात आली आरोपीने चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली. चांदवड पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असुन आरोपीस पुढील तपासाकरीता ०५ दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. सचिन पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक / समीर बारावरकर हे पुढील तपास करीत आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, समीर बारावरकर, सपोनि सागर शिंपी, पोउपनि संदिप पाटील, मुकेश गुजर, सहापोउपनि / विठठल बागुल, पोहता सोनवणे, पोना लोखंडे, गांगुर्डे पोकॉ कुणाल मोरे व चांदवड व मनमाड पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक हे सामिल होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या