Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


भानू भंगा-या प्रतिक पगारे याला बेस्ट अॅक्टर अवार्ड


 मनमाड.भानू भंगा-या या लघुपटातील मुख्य कलाकार प्रतिक पगारे याला  भारतीय सिनेयुग प्रोड्युक्शन अकॅडमी मुंबई प्रस्तुत अनलिमिटेड सिनेमा व मराठवाडा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल 2020 /21 या फेस्टिव्हलमध्ये बेस्ट अॅक्टर अवार्ड मिळाला..
   डायरेक्टर अनिल कुमार शिंपी यांनी अंधेरी मुंबई येथे आयोजन केले होते फेस्टिव्हलमध्ये 150 हुन अधिक शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या होत्या यात फूचर फिल्म,शॉर्ट फिल्म,डॉक्युमेंटरी फिल्म,वेब सिरीज,व्हिडिओ अलबम,ऍड फिल्म चा समावेश होता.
150 चित्रपटातुन मनमाडचा भूमीपुत्र प्रतीक पगारे याने आपली वेगळीच छाप टाकुन बेस्ट अॅक्टर म्हणुन पुरस्कार पटकवीला व आपली नविन ओळख निर्माण केली....
 प्रतीक पगारे(भानू भंगा-या) याचे विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे... सागर आर्ट फिल्म मनमाड निर्मित
भानू भंगा-या या लघुपटाचे लेखन  , दिग्दर्शन हिरामण मनोहर यांनी केले आहे तर चित्रीकरण नाना आहिरे यांनी केले आहे...
फेस्टीव्हलला उपस्थित असलेले   निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर, सहनिर्माता व कॅमेरामन नाना आहिरे कलाकार प्रकाश पगारे  यानी अंधेरी मुंबई येथे फेस्टीव्हलला हजेरी लावून  पुरस्कार स्वीकारला.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या